- रोमन संख्यांमध्ये दशमान पध्दतीचा थेट वापर केला जात नाही. रोमन संख्यापध्दतीमध्ये 0 ला स्थान नाही.
- रोमन संख्यापध्दतीमध्ये खालीलप्रमाणे खुणा वापरल्या जातात. (निळ्या रंगानी दर्शविलेल्या खुणाच सामान्यपणे परीक्षेतील उदाहरणांमध्ये वापराव्या लागतात)
|
रोमन
संख्यापध्दतीतील खुणा
|
1
ते 20
संख्यांचे रोमन रुपांतर
|
4.
रोमन संख्यांमध्ये 1,
10, 100 या संख्यांसाठीच्या खुणा लागोपाठ तीनदा येउ शकतात, म्हणजे त्या खुणेच्या तिपटीपर्यंतच्या संख्या
त्या खुणेच्या वापरातून लिहिता येतात. उदा. 3 = III, 30 = XXX, 300 = CCC.
5.
1, 10, 100 या संख्यांसाठीच्या खुणांची चौपट लिहायची असल्यास त्याखुणेपुढे सारणीतील पुढील खुण येते. उदा. 4 = IV, 40 = XL, 400 = CD.
6.
5, 50, 500 या संख्यांच्या खुणा लागोपाठ दोनदा येउ शकत नाहीत.
अधिक मोठ्या संख्या
7.
2145 = (2 × 1000)
+ (1 × 100) + 40 + 5 = MMCXLV
8.
890 = (500 × 1) +
(3 × 100) + 90 = DCCCXC
9.
465 = 400 + 50 + 10 + 5
= CDLXV
10.
120 = 100 + (2 × 10) =
CXX






0 comments:
Post a Comment