|
2 ची कसोटी
·
कोणत्याही सम संख्येस 2 ने पूर्ण भाग जातो. उदा. 27720
3 ची कसोटी
·
जर दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या एक अंकी बेरजेस 3 ने पूर्ण भाग जात असेल, तर दिलेल्या संख्येसदेखील 3 ने पूर्ण भाग जातो. उदा. 27720
·
27720 या संख्येतील अंकांची बेरीज = 2 + 7 + 7 + 2 + 0 = 18
·
18 या संख्येतील अंकांची बेरीज = 1 + 8 = 9
·
9 ला 3 ने पूर्ण भाग जात असल्याने 27720 ला देखील 3 ने पूर्ण भाग जातो.
4 ची कसोटी
·
जर दिलेल्या संख्येतील शेवटच्या दोन अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जात असेल
किंवा शेवटचे दोन्ही अंक 0 असतील, तर दिलेल्या संख्येसदेखील 4 ने पूर्ण भाग जातो. उदा. 27720
·
27720 या संख्येतील शेवटच्या दोन अंकांपासून तयार होणारी संख्या 20.
·
20 या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो.
·
म्हणून 27720 ला देखील 4 ने पूर्ण भाग जातो.
·
गंमत म्हणून दुसरे उदाहरण घेऊ - 12345678900.
·
ही संख्या एका दमात कदाचित वाचताही येणार नाही. परंतु शेवटच्या दोन अंकांकडे पाहून या
संख्येला 4ने पूर्ण भाग जातो असे सांगू शकतो.
5 ची कसोटी
·
जर दिलेल्या संख्येच्या एककस्थानी 0 किंवा 5 यापैकी एक अंक असेल, तर दिलेल्या संख्येस 5 ने पूर्ण भाग जातो. उदा. 27720.
6 ची कसोटी
·
जर दिलेल्या संख्येस 2 व 3 या दोन्ही संख्यांनी
पूर्ण भाग जात असेल, तर दिलेल्या संख्येस 6 ने पूर्ण भाग जातो. उदा. 27720.
·
ही संख्या सम असल्याने तिला 2 ने पूर्ण भाग जातो.
·
तिच्या अंकांच्या बेरजेला म्हणजे 2 + 7 + 7 + 2 + 0 = 18 ला 3 ने पूर्ण भाग जात असल्यामुळे 27720 या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो.
·
म्हणजेच या संख्येस 2 व 3 या दोन्ही संख्यांनी भाग जातो, म्हणून त्या संख्येस 6 नेही पूर्ण भाग जातो.
7 ची कसोटी
·
दिलेल्या संख्येतील एकक स्थानाच्या अंकाची दुप्पट करावी.
·
ही दुप्पट उर्वरित अंकातून वजा करावी. तयार झालेल्या संख्येस 7 ने पूर्ण भाग जात असल्यास दिलेल्या
संख्येसदेखील 7 ने पूर्ण भाग जातो. उदा. 27720.
·
या संख्येच्या एककस्थानी 0 असल्याने तो सोडून देऊ.
उर्वरित संख्येचा म्हणजे 2772 चा विचार करु.
·
2772 च्या एककस्थानचा अंक 2. त्याची दुप्पट 4. ती 277 मधून वजा करु. 277 - 4 = 273.
·
273 साठी पुन्हा हीच कसोटी वापरु.
·
273 च्या एककस्थानचा अंक 3. त्याची दुप्पट 6. ती 27 मधून वजा करु. 27 - 6 = 21.
·
21 ला 7 ने पूर्ण भाग जातो, म्हणून 27720 ला देखील 7 ने पूर्ण भाग जातो.
8 ची कसोटी
·
दिलेल्या संख्येतील शेवटच्या तीन अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येस 8 ने पूर्ण भाग जात असेल किंवा
शेवटचे तीन अंक 0 असतील, तर, दिलेल्या संख्येसदेखील 8 ने पूर्ण भाग जातो. उदा. 27720.
·
यात 27720 या संख्येतील शेवटच्या तीन अंकांपासून तयार होणारी संख्या 720. 720 ला 8 ने पूर्ण भाग जात
असल्याने 27720 ला 8 ने पूर्ण भाग जातो.
9 ची कसोटी
·
दिलेल्या संख्येतील अंकांच्या एक अंकी बेरजेस 9 ने पूर्ण भाग जात असेल तर, दिलेल्या संख्येसदेखील 9ने पूर्ण भाग जातो. उदा. 27720.
·
27720 : 2 + 7 + 7 + 2 + 0 = 18, 18 : 1 + 8 = 9.
·
ज्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो, त्या संख्येला 9 ने पूर्ण भाग जाईलच असे नाही, मात्र, ज्या संख्येला9 ने पूर्ण भाग जातो, त्या संख्येला 3 ने निश्चित भाग जातो.
10 ची कसोटी
उदा. 27720
11 ची कसोटी
12 ची कसोटी
|






0 comments:
Post a Comment